.. definitely NO!! Day by day, i am just hate my life. This is not the way i had expected my life to be. It is so dull. Last 9 days vacation was awesome and then the routine job started. I suppose the job is the reason which is kind of boring. After all whose job is exiting? :-) Its such a routine job which i hate. My simple expectations from job is nothing but excitements, challenges, learning new stuff, compete with your colleagues for better performances. The most pathetic thing for me is i am the only resource on this project for QA for the entire stuff. I don't have anybody to help me, compete me, cheer me, motivate me, understand me which makes the job kind of boring.
म्हणुन मग त्याला नविन खेळ म्हणुन 'क्ले' आणला. रंगीत क्ले, त्यासाठी मोल्ड्स, आणि छोटी सुरी, लाटणं असा सगळा लवाजमा आहे. साहेबांना फारंच आवडला आहे तो खेळ. अश्याच एका क्षणी मी त्याला गर्क असताना टिपला. आणि तो फोटो फारच मला आवडला. मस्त आला आहे अगदी :-)
फोटो वरुन आठवले, आजकाल कॅमेरा फारच सुधारला आहे. अगदी मस्त फोटोज येत आहेत. 'P' अर्थात प्रोग्रॅम मोडचे सेटींग मध्ये जे मी बदलले होते ते मस्तच जमुन आले आहे. परवा पाण्याच्या थेंबाचा काढलेला फोटोही अस्साच. इतक्या वर्षात प्रयत्न करुनही जमत नव्हता, यावेळेस सहजच मस्त जमुन आला.
http://manatale.wordpress.com/
इथला मुक्काम संपलाssss
तुम्ही संगणक कंपनी मध्ये काम करत असाल आणि विषेशः 'टेस्टींग' मध्ये असाल तर किडे (bugs) मिळणं कित्ती महत्वाचे आहे हे तुम्हाला माहीत असेलच. सध्या ज्याच्यावर मी काम करतोय त्यातही किड्यांनी फारच उच्छाद मांडलाय. तसे किडे पकडण्यात मी फारच पटाईत आहे, पण सध्या काही किडे माझ्या तावडीतुन सुटले आणी सरळ प्रॉडक्शन वर जावुन कस्टमर्सला छळु लागले त्यामुळे माझी फार चिडचिड झाली. अर्थात मला फार कोणी काही बोलले नाही कारण दोष माझा नव्हताच मुळी. दोष आमच्या टेस्टींग प्रोसेस मध्ये होता जो मी गेली वर्षभर ओरडुन सांगतोय की यामुळे किडे टेस्टींगमधुन सुटण्याची शक्यता आहे. शेवटी 'जिसका मुझे डर था वो बात हो ही गयी!"
मग मात्र माझ्या म्हणण्याची दखल घेतली गेली आणि मला माझे म्हणणे 'इंप्लीमेंट' करण्याची मुभा मिळाली.
किड्यांनो, आता मात्र माझ्या जाळ्यात सापडा बरं का!, नाहीतर मग मात्र माझ काही खरं नाही :-)
... काय झालेय कळत नाही, पण २००९ सुरू झाल्यापासुन एकही गोष्ट माझ्या मनासारखी होत नाहीये. २००८ मला आठवतेय प्रत्येक गोष्ट ती छोटी असो की मोठी, माझ्या मनात यायचा अवकाश ती पुर्ण होतं होती. पदोपदी मला देव आजुबाजुलाच कोठेतरी आहे आणी माझे तो ऐकतोय याचा प्रत्यय येत होता. आता बघा ना. मला 'मारुती स्विफ्ट' कित्येक वर्षांपासुन घ्यायची होती पण जमतच नव्हते, २००८ मध्ये घेतली. वाढते वजन डोक्याला त्रास होऊ लागला होता, २००८ मध्ये कसे कुणास ठाउक, पण फारच मनावर घेतले आणी जाणवण्याइतपत फरक पडला जवळजवळ ८ कि.ग्रॅ. कमी झाले. अमेरीकावारी झाली. घरातले इंटेरीयर बरेच चेंज करुन झाले, जे बऱ्याच वर्षांपासुन मनात होते. सायकल घेतली या आणी अश्या अनेक गोष्टी आहेत ज्या नमुद करता येतील.
पण २००९ मध्ये एक गोष्ट मनासारखी होईल तर शप्पथ!!
on किड्यांचा उच्छाद