ओजस
काही दिवसांपासुन दुखणं आणि दवाखाना ओजसच्या मागेच लागला आहे. काही दिवसांपुर्वी ओजस १-२दा घरात खेळताना पडला आणि पायाला सुज आली. बरेच दिवस ती सुज आणी दुखणं पुरले, शेवटी पायाचा एक्स-रे काढावा लागला. नशीब फ्रॅक्चर नव्हते. ते होतेय नं होतेय तोपर्यंत हे नविन. त्याचा उजवा डोळा बारीक आणि लाल झाला होता आणि पाणी येतं होते, त्यात ताप आला. म्हणुन बायको डॉक्टरकडे घेउन गेली. दुर्दैव की नेहमीच्या डॉक्टर आल्या नव्हत्या, त्याऐवजी त्यांचे डॉक्टर पती होते. त्यांनी कुठलेतरी औषध दिले त्यानंतर त्याला उलट्या सुरू झाल्या. ओजस काही दिवसांपासुन 'दम लागला' असं म्हणत होता तर डॉक्टरांनी 'पल्स रेट' चेक करायला सांगीतला. त्याच बरोबर त्याच्या कानाला जो extra skin tag आहे त्याचा संबंध त्यांनी पोटाशी आहे तेंव्हा सोनोग्राफी करुन घ्या सांगीतले.
त्याप्रमाणे सकाळी आंबेकरांच्या दवाखान्यात 'पल्स रेट' चेक केला तो १५० आला, डॉक्टर म्हणाले 'जास्ती आहे' माझ्या तर फुल्ल कपाळात गेल्या होत्या. ऑफीसमध्ये कामात लक्षच लागत नव्हते मग दुपारीच घरी आलो. तोपर्यंत नशीब म्हणजे नेहमीच्या डॉक्टर भेटल्या. त्यांनी उलट्यांचे कारण बदललेले औषध सांगीतले आणि नेहमीचे औषध दिले. तसेच ताप असल्याने 'पल्स रेट' जास्ती आहे असे सांगीतले. माझं डोक असले सटकले होते, च्यायला त्यांच्या येड झ* पती डॉक्टरला हे कळले नाही का?? तरी पण उगाच शंका नको म्हणुन पोटाची सोनोग्राफी करुन घेतली आणी ती नॉर्मल आली...!!
'पल्स रेट' अधुन-मधुन चेक करत रहायला सांगीतलेय जो सध्यातरी ठिक येतोय १२०-१३० दरम्यान.
बिच्चारा ओजस ३ वर्षाचा नाही झाला तर 'एक्स रे', 'पल्स रेट', सोनोग्राफी कश्या कश्याला सामोरे जावे लागले. त्यातच अभिनव मध्ये हिमोग्राम नंबर लागतात म्हणे.. काय नाटकं..मग आज त्याचे रक्त पण देउन आलो काय करणार..
देवा!!! आज होळी.. खरंच बोंबा मारायला लावल्यास रे..!!