किड्यांचा उच्छाद
तुम्ही संगणक कंपनी मध्ये काम करत असाल आणि विषेशः 'टेस्टींग' मध्ये असाल तर किडे (bugs) मिळणं कित्ती महत्वाचे आहे हे तुम्हाला माहीत असेलच. सध्या ज्याच्यावर मी काम करतोय त्यातही किड्यांनी फारच उच्छाद मांडलाय. तसे किडे पकडण्यात मी फारच पटाईत आहे, पण सध्या काही किडे माझ्या तावडीतुन सुटले आणी सरळ प्रॉडक्शन वर जावुन कस्टमर्सला छळु लागले त्यामुळे माझी फार चिडचिड झाली. अर्थात मला फार कोणी काही बोलले नाही कारण दोष माझा नव्हताच मुळी. दोष आमच्या टेस्टींग प्रोसेस मध्ये होता जो मी गेली वर्षभर ओरडुन सांगतोय की यामुळे किडे टेस्टींगमधुन सुटण्याची शक्यता आहे. शेवटी 'जिसका मुझे डर था वो बात हो ही गयी!"
मग मात्र माझ्या म्हणण्याची दखल घेतली गेली आणि मला माझे म्हणणे 'इंप्लीमेंट' करण्याची मुभा मिळाली.
किड्यांनो, आता मात्र माझ्या जाळ्यात सापडा बरं का!, नाहीतर मग मात्र माझ काही खरं नाही :-)
Comments
कीडे पकडणे हाच आमचाही पोटा पाण्याचा धंदा आहे ...