देवाचं आणि माझं जरा बिनसलेय
... काय झालेय कळत नाही, पण २००९ सुरू झाल्यापासुन एकही गोष्ट माझ्या मनासारखी होत नाहीये. २००८ मला आठवतेय प्रत्येक गोष्ट ती छोटी असो की मोठी, माझ्या मनात यायचा अवकाश ती पुर्ण होतं होती. पदोपदी मला देव आजुबाजुलाच कोठेतरी आहे आणी माझे तो ऐकतोय याचा प्रत्यय येत होता. आता बघा ना. मला 'मारुती स्विफ्ट' कित्येक वर्षांपासुन घ्यायची होती पण जमतच नव्हते, २००८ मध्ये घेतली. वाढते वजन डोक्याला त्रास होऊ लागला होता, २००८ मध्ये कसे कुणास ठाउक, पण फारच मनावर घेतले आणी जाणवण्याइतपत फरक पडला जवळजवळ ८ कि.ग्रॅ. कमी झाले. अमेरीकावारी झाली. घरातले इंटेरीयर बरेच चेंज करुन झाले, जे बऱ्याच वर्षांपासुन मनात होते. सायकल घेतली या आणी अश्या अनेक गोष्टी आहेत ज्या नमुद करता येतील.
पण २००९ मध्ये एक गोष्ट मनासारखी होईल तर शप्पथ!!