नविन कथा सुचतेय.. पण मध्येच अडकलोय
सुरुवात तर केली आहे, शेवट काय करायचा तेही डोक्यात पक्कं आहे, पण मधलंच काही सुचत नाहिये हो.. बघा काही मदत करता आली तर...
ए बंड्या !! अरे झोपला का? चल सिग्नल सुटला. निमीष च्या आवाजाने रोहन भानावर आला. त्याने स्कॉर्पियो गेअर मध्ये टाकली आणि गर्दीतुन वाट काढत पुढे निघाला. त्याचे लक्ष मात्र स्कॉर्पियोच्या आरश्यातच होते. पुढचा सिग्नल लागला आणी रोहन परत आरश्यात पहाण्यात दंग झाला. यावेळेसही निमीष ला रोहनला सिग्नल सुटल्याची जाणीव करुन द्यावी लागली. त्यामुळे पुढच्या सिग्नलला निमीष सावध होता. सिग्नल सुटायच्या आधीच त्याने रोहनकडे बघीतले.
रोहन स्वःताशीच हसत स्कॉर्पियोच्या आरश्यातुन मागे बघत होता.
"अरे काय झालेय तुला? लक्षं कुठेय तुझं ?" निमीषने काहीश्या वैतागलेल्या सुरात रोहन जिकडे बघत होता तिकडे मागे वळुन बघत रोहनला विचारले.
"काही नाही रे!"- रोहन
"काही नाही? मग तु वळुन वळुन मागे काय बघत आहेस?"- निमीष
निंमीषची उत्सुकता जागृत झाली आणी त्याने गाडीच्या आरश्यातुन मागे बघीतले.
मागे pink कलरच्या scooty वर एक मुलगी आपल्याच नादात तिच्या गाडीच्या आरश्यात बघुन एका हाताने डोळ्यातील Contact Lense निट करत, तर दुसऱ्या हाताने चेहऱ्यावर येणारी केसांची बट सावरत होती.
"Man, She is damn cute !!", निमीष स्वतःशीच पुटपुटला.
"I know", रोहन.
"काय साहेब, तुम्ही कधी पासुन असल्या गोष्टींमध्ये Interest घ्यायला लागलात?", रोहनच्या पाठीवर थाप मारत निमीष म्हणाला.
"Please हा. Interest वगैरे काही नाही, general सिग्नलवरचा विरंगुळा, बाकी काही नाही" - रोहन
तेवढ्यात सिग्नल सुटला. रोहनने आपल्या घड्याळावर नजर टाकली आणि आपल्या स्कॉर्पियोला वेग दिला.
"सकाळी सकाळी interview म्हणजे खरंच वैताग आहे हं!. आणी तो पण freshars cha, कॉलेज प्रोजेक्ट साठी" - रोहन
"हो ना. सकाळ म्हणजे मस्त कॉफी पित, mail, orkut check करण्याची वेळ. आपले HR पण ना. समोरचा म्हणला ९ वाजता येतो interview ला की लगेच हो म्हणणार. अरे आपल्या कंपनीचे पण काही स्टेटस आहे की नाही? हे कॉलेज स्टुडंस, साला आपल्याच डोक्याला त्रास होणार आहे." निमीष ने ही आपला त्रागा व्यक्त केला.
रोहनने गाडी कंपनीच्या "Reserved Parking" मध्ये park केली. निमीषने तोपर्यंत लिफ्ट चे बटन दाबले होतेच. लिफ्ट येताच दोघेही जण आत घुसले आणी कंपनीत आले.
"We are 15 mins late! HR कडुन खा आता शिव्या" असा विचार करतच दोघेही Conf Room मध्ये आले. बघतात तर आत मध्ये कोणीच नाही.
"घ्या!! एवढी धावपळ करुन या.. आणी इथे Candidateच हजर नाही.."- निमीष परत चालु झाला. दोघेही परत बाहेर आले, तेवढ्यात office entrance मधुन त्यांना ति सिग्नलवर दिसलेली 'ती' आत येताना दिसली.
Green कलरचा पूल-ओव्हर, Black three-forth, Pink कलरचा hair-band, हातात घट्ट धरलेली फाईल, डोळ्यांत गोंधळलेले भाव.
"काय अवतार आहे! असे कोणी Interview ला येते का?"- रोहन, "हे असले कपडे कोणी दुसऱ्याने घातले असते तर भयानकच दिसले असते. But just because she is wearing it, she is... she is looking...."
"Awesome!!" निमीषने रोहनचे अर्धवट वाक्य पुर्ण केले.
रितुने आत आल्यावर समोर उभ्या असलेल्या आणी 'Formals' मधल्या त्या दोघांकडे पाहीले. आधीच एक तर उशीर झालेला त्यात आपले कपडे इथे जरा mismatchच दिसत आहेत असा एक विचार तिच्या मनात येउन गेला. तरी घरुन निघताना तिची आई तिला म्हणालीच होती, "काय रितु तुझे कपडे हे, अगं Interview ला चालली आहेस ना?"
तेव्हा तिनेच आईला सांगीतले होते, "काय गं मम्मा, मी काय Government Service साठी चालले आहे का? I am going in Advertising Agency. I am a "Mass Communication" student, आणि तिथले सगळेही अश्याच वातावरणातुन आलेले असणार. These clothes will perfectly go with the environment. Don't worry"
रोहनने तोपर्यंत Interview Candidates ची लिस्ट काढली आणि पहीले नाव वाचले, "रितु प्रधान". स्वतःचे कपडे ठिक-ठाक केले, केसांमधुन एक हात फिरवला आणि रिसेप्शन मध्ये गेला. चेहऱ्यावर नेहमीचेच 'चार्मींग स्माईल' आणुन त्याने शक्य तितक्या कमी आवाजात विचारले, "रितु प्रधान?, प्लिज कम धिस वे!" रोहनला आपल्या चार्मींग स्माईलवर फार विश्वास होता. त्याला माहीत होते की या स्माईल मुळे तो अधीकच स्मार्ट दिसतो.