बियर
तसा मी पेताड वगैरे मुळीच नाही. मला कोणी विचारले की "तु घेतोस का?" तर माझा प्रतिप्रश्न असतो की 'घेतो म्हणजे पिउ शकतोस का? का रेग्युलरली पितोस का?' माझे 'घेणे' म्हणजे वर्षातुन फारतर फार ५-६ वेळा, ते पण ऑफीसच्या पार्टीजमध्येच, स्वतःचे पैसे खर्च करुन शक्यतो नाहीच. पण आजकाल माझे बिअर/बियर बद्दल प्रेम फारच वाढले आहे. सदांकदा ती थंडगार बाटली डोळ्यापुढे तरंगते आहे. अर्थात अजुन मी काही घेतली नाहीये. खरं तर दारुने दुखः विसरतात, प्रॉब्लेम्स चा विसरपडतो हे सगळे मला पटत नाही. पण दारु पितानाचा तो माहोल असतो ना तो खासच.
चार मित्र एकत्र बसुन आपण जगातले सगळ्यात मोठे वक्ते, तत्वन्यानी अश्या अविर्भावात मतं मांडणे, हातात थंडगार ग्लास, सोबत चकली, खारे दाणे, वेफर्स, भिजवलेले भुईमुगाच्या शेंगातील दाणे.. आहाहाsss. २-४ घोट घश्यात गेले की मस्त हलकं हलकं वाटत. मन मोरपिसासारखे हवेत उडतेय की काय असे वाटते आणि मग गप्पांना वाटा फुटतात, हास्याचे फवारे उडतात आणि मन एकदम प्रसन्न होते.
ह्म्म्म.. जाउद्यात.. चला आईने कॉफी बनवलीये, येतो जरा 'पिउन'