मिडास राजा, दादा कोंडके आणि भारतीय क्र
मिडास राजा, दादा कोंडके आणि भारतीय क्रिकेट टीम या सगळयांमध्ये काय साम्य आहे??? आहे!!!.
मिडास राजाला असे वरदान मिळाले होते की तो ज्या वस्तुला हात लावेल ती सोन्याची होईल. दादा कोंडकेंचा चित्रपट होता 'बोट लावीन तिथे गुदगुल्या' भारतीय क्रिकेट टिम चे अगदी तस्सेच झाले आहे. जी क्रिकेट मॅच खेळु ती जिंकतोच आहे (१-२ अपवाद वगळता). T२० विश्व चॅम्पियन, ऑस्ट्रेलियाचा त्यांच्याच भुमीत पराभव, इंग्लंडला भारतीय भुमीत व्हाईट-वॉश (५-०), श्रीलंकाचा त्यांच्याच भुमीत पराभव (४-१) आणी आता न्युझीलंडचा ही त्यांच्याच भुमीत पराभव (३-०) आणि अजुन एक सामना शिल्लक आहे.
न्युझीलंडच्या जखमा माझ्या मनात अजुनही होत्या. ५एक वर्षांपुर्वी भारतीय टिम चा न्युझीलंड मध्ये धुव्वा उडाला होता आणि तेंव्हापासुन न्युझीलंडचा ही दारुण पराभव व्हावा अशी माझी फार इच्छा होती. काल ती पुर्ण झाली. सेहवाग जेंव्ह्या फॉर्म मध्ये असतो तेंव्हा कोणीच काही करु शकत नाही. काल त्याने ७६ चेंडुत नाबाद १२५ धावा फटकावल्या.
न्युझीलंडचा कर्णधार व्हिटोरी म्हणतो, "एक तर तुम्हाला सहवाग ला आउट करता आले पाहीजे नाहीतर ५०० धावातरी केल्या किंवा करता आल्या पाहीजेत. हे जर का जमणार नसेल तर पराभव अटळ आहे". त्याचे हे व्यक्तव्यच सर्व काही स्पष्ट करतो.
बाकी काही असो.. भारतीय टिम सध्या जोशात आहे, आणि भारतीय नागरीक आणि क्रिकेट खेळाचा चाहता म्हणुन हे सर्व फारच आनंददायी आहे.